Wednesday, 27 December 2017

पिंटू भाऊंचा नवीन स्वेटर - गुलाबी थंडी


प्रेमात असणाऱ्यांसाठीच काय ते थंडी ही "गुलाबी थंडी" असते बाकी इतरांसाठी थंडी ही फक्त #हुडहुडी असते

वैनीनं सांगितलं नवा स्वेटर आणा...काल साताऱ्यातून २५० ला नेपाळ्याकडून घेतला....तिला दाखवाय अंगात घालून गेलो...तर वैनी म्हणती कशी दाजी तुम्हाला गार #लागतंय कि थंडी#वाजतीया.....च्या आयला गेलो नस्तु तर बरं झालं असत....तीन म्हणाय पायजे होत रंग मस्त हाय,यात चिकना दिसतंय माझं दाजी.....पण #घोर_अपमान केला..मी पण तिच्यासाठी एक स्कार्प आणला हुता..पण तसाच खिशात ठेऊन घरच्या राणीला दिला...

तुम्हाला तरी चांगला वाटतोय ना..तर मग हात वर करून सांगा

पिंटू पवार

स्रोत :- पिंटू पवार

Monday, 25 December 2017

कोरड्यास


घरच्यासनी आता एकच सुचना हाय,आता कोरड्यास करत जाऊ नका फक्त भाकरीच बांधुन देत जावा म्हंजी राणात जाऊन कोरड्या भाकरीबरोबर हे खात बसतु

कव्हा तरी पिज्जा,बर्गर,चायनीज,पंजाबी थाळी,गुजराती थाळी,केरळ टाईप सांबार बनवाव पण नाय रोज असल जनावरागत नुस्त घासफुस,फार जीभेची चव गेलीया
वैनीकड पण तेच आयटम सगळा घोटाळा हाय,यावर आता काय तरी उपाय करतु

स्रोत :- पिंटू पवार

समाजसेवा - गॅसच्या टाक्या


आज गॅसच्या टाक्या घेतल्या कि दोनशे रूपयाची कमाई हुणार,वस्तीवरची माणस एका टाकीमाग पंचविस रुपये देतात,कारण गाडी दिवसात कधी पण येते,त्यांना दिवसाच काम बुडवुन द्यायच नस्त,मी पण मग समाजसेवा करतो,अण फुकाट समाजसेवा केली कि त्याची किंमत कळत नस्ते,मला तर काय त्रास नसतो दारातच गाडी थांबते,तीथन पायान टाकी ढकलली की थेट दुकानपाशीच थांबते,सगळ्यांची पुस्तक ईथच असतात एकाद्याच बुकिंग नसल कि त्याच्याकडुन जादा शंभर काढाय घावतात,अण दुसर म्हणजे ते पण खुश,त्यात हि माणस माझ्या वार्डातील नाहित,समजा पुढ इलक्शेनला उभ राहिलो तर मताची भिक मागताना लाज वाटाय नको


स्रोत :- https://www.facebook.com/baba.pawar1

Thursday, 14 December 2017

माझी चुलती अक्का

यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच मदत करतात.हि माझी चुलती अक्का,आज वयाची ७५ री गाठली तरी रानात काम केल्याशिवाय तिला राहवत नाही,मुले मुली ओरडतात पण अक्का कोणाला हि दाद देत नाही...आयुष्य शेतीत गेले त्या शेतीत काम केल्याशिवाय तिला चैन पडत नाही...अक्काच्या मुलांना अन मुलींना सांगणे आहे कि तिला काम करू द्या...तुम्ही तिला सुखी ठेवण्यासाठी मुंबईला नेऊ नका....कारण तीच सुख याच मातीत आहे.....माझ्या जपानला राहणाऱ्या भाच्याला एकच सांगणे आहे....तिला जपानला घेऊन जा...तिथल्या शेतीच तिला ज्ञान दे....म्हणजे आक्का अजून जोरात काम करेल....दुसऱ्या वकील भाचीला सांगणे या वर पर्याय काढ..इंजिनिअर असणाऱ्या पुतण्याला सांगणे आहे..तिला आधुनिक साधने आणून दे....एसटीत असणाऱ्या माझ्या भावाला म्हणजेच तिच्या थोरल्या मुलाला एकच सांगणे आहे...तिला जो मोफतचा जो पास देतोना.....त्यानं तिला महाराष्ट्र दौरा करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या मातीतील शेतीच ज्ञान घेऊन येऊ दे......मग मी अक्काला काय सुट्टी देत नाय रोज तिला काम कामच लावतो....तरच आक्का आराम करेल माझ्या या अक्काला तिच्या या कष्ट करण्याच्या सवयीला मानाचा मुजरा....तीच हे कष्ट बघून मला पण प्रेरणा मिळते ,..यशस्वी व्हायचे असेल तर कल्पना नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच करा अक्का खरच ग्रेट आहे तू


स्रोत :- पिंटू पवार

पिंटू भाऊंचा नवीन स्वेटर - गुलाबी थंडी

प्रेमात असणाऱ्यांसाठीच काय ते थंडी ही "गुलाबी थंडी" असते बाकी इतरांसाठी थंडी ही फक्त  # हुडहुडी  असते वैनीनं सांगितलं नवा स्...